आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Offenders Of Nirbhaya Give Hanging Punishment

दिल्ली सामुहिक बलात्कार: चार नराधमांना फाशीच योग्य, संतप्त देशवासीयांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना दोषी ठरवल्यानंतर देशभरातून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतभेद बाजूला सारत मृत्युदंडाच्या शिक्षेचा पुरस्कार केला. अशा शिक्षेमुळे घृणास्पद कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.


लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या, हे सामूहिक बलात्कार व हत्येचे प्रकरण आहे. आरोपींनी अतिशय गंभीर गुन्हा केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. चौघांना फाशीची शिक्षा दिल्यास अन्य कुणाची हा गुन्हा करण्याची हिंमत होणार नाही.


बाल न्यायिक मंडळाने अल्पवयीन आरोपीला ठोठावलेल्या शिक्षेबद्दल आपण असमाधानी असल्याचे स्वराज म्हणाल्या. संबंधित आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस अंबिका सोनी यांनी निकालाचे स्वागत करत म्हटले की, हा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत होऊ नये, असा संदेश शिक्षेतून मिळावा. भविष्यात अशा घटना होणार नाहीत, अशी मी आशा करते.


कायद्यात अनेक दुरुस्त्या
महिला अत्याचारविरोधी कायद्यात आम्ही अनेक दुरुस्त्या केल्या आहेत. नव्या कायद्याअंतर्गत अशा खटल्यांची सुनावणी होईल. नव्या कायद्यानुसार आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे.’’
सुशीलकुमार शिंदे,
केंद्रीय गृहमंत्री