आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fourth Day Opposition Debats On Conversion In Rajay Sabha

नो पीएम, नो हाऊस! धर्मांतराच्या मुद्द्यावर चौथ्या दिवशीही राज्यसभेत गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यसभेत धर्मांतराच्या मुद्द्यावर सातत्याने चौथ्या दिवशीही गदारोळ सुरूच होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘नो पीएम, नो हाऊस’ अशा घोषणा देत गोंधळ घातला.गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते; परंतु त्या वेळी विरोधकांनी गदारोळ केला.
धर्मांतराच्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चेची मागणी विरोधकांनी केली. त्याचबरोबर त्यावर पंतप्रधानांनीच उत्तरे द्यावीत, असे विरोधकांचे म्हणणे होते; परंतु सत्ताधारी पक्ष त्यासाठी तयार नव्हता. गेल्या चार दिवसांपासून त्यावर पेच निर्माण झाला आहे. नियम २६७ अंतर्गत जातीय दंगल तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अगोदर सहमती झाली होती; परंतु माकप नेते पी. राजीव म्हणाले, प्रकरण अनेक विभागांशी संबंधित आहे. इतर सदस्यांनीही त्यांचे समर्थन केले; परंतु सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यास जोरदार विरोध सुरू केला. काही वेळाने दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आम्हाला बोलू देत नाहीत. हे योग्य नाही.
पंतप्रधान सभागृहातून निघून गेले. ही गोष्ट आम्ही कदापि मान्य करणार नाही.
-आनंद शर्मा, राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते

..तर पीएम बोलले असते
लंचच्या अगोदर धर्मांतर मुद्यावर चर्चेस सहमती झाली होती. त्यावेळी पंतप्रधान उपस्थित होते. चर्चेवर सदस्य समाधानी झाले नसते तर पंतप्रधानांनी काही बोलले असते.
-राजनाथ सिंह, गृहमंत्री.