आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fraud Makers In Milk They Get Life Imprisonment, Supreme Court

दुधात भेसळ करणा-यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भेसळयुक्त दुधाचे उत्पादन आणि विक्री करणा-यांना जन्मठेपच व्हायला हवी. यासाठी अशी भेसळ करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारांनी कायद्यात दुरुस्ती करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या पीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान हे निर्देश दिले. उत्तर प्रदेश, प. बंगाल आणि ओडिशा या राज्यांनी दुधात भेसळ केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली असल्याचे न्यायालयात सांगितले.
सध्या भेसळयुक्त दुधाचे उत्पादन आणि विक्री करणा-यांसाठी अन्नसुरक्षा कायद्यात केवळ सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. यामुळे कुणावरच वचक राहिलेला नाही. शिक्षेची ही तरतूद वाढवून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करावी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. तसे निर्देशही राज्यांना दिले. 2011 मध्ये अन्नसुरक्षा प्राधिकरणाने देशभरात दुधाचे नमुने गोळा करून तपासणी केली होती. यात 68 टक्क्यांहून अधिक नमुने भेसळयुक्त असल्याचे आढळले होते. त्यावरून दाखल जनहित याचिकेवर न्यायालयाने उपरोक्त निर्देश दिले.