आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Meal To Hungry Person In This Bank In Delhi

या बँकेत भुकेल्यांना मिळते मोफत भाकरी, दिल्लीतील व्यापार्‍यांचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आजवर आपण मनी बँक, ब्लड बँक, आय बँक व त्यांच्या सेवेबाबत ऐकले आहे. परंतु कधी "रोटी बँक'बाबत ऐकले नसेल. परंतु राजधानी दिल्लीत अशा प्रकारची अनोखी बँक सुरू झाली आहे. ही बँक कुण्या सरकारने अथवा कंपनी, स्वयंसेवी संस्थेने नव्हे तर आझादपूर येथील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन सुरू केली आहे. या बँकेतून प्रत्येक भुकेल्या, गरजू व्यक्तीच्या दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय केली जाते.

आझादपूर येथील आदर्शनगर भागातील फळ व्यापारी राजकुमार भाटिया यांच्या कल्पनेतून तीन महिन्यांपूर्वी हा उपक्रम सुरू झाला.आज ८० व्यापारी या उपम्रमात सहभागी झाले आहेत. ते घरून येताना दररोज बँकेसाठी म्हणून भाकरी, भाजी, लोणचे, चटणी असे खाद्यपदार्थ घेऊन येतात. नंतर त्याचे गरजूंना वाटप केले जाते. रविवारी मार्केट बंद असल्याने ही सेवा (बँक) बंद असते.

तिसरी शाखा निघणार :
रोटी बँकेची आणखी एक शाखा इंद्रानगरमध्ये सुरू झाली आहे. तसेच पंचवटी कॉलनीत महिलांनी पुढाकार घेऊन तिसरी शाखा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

अशी सुचली कल्पना
राजकुमार भाटिया यांनी सांगितले की, एके दिवशी माझ्याकडे एक भुकेली व्यक्ती आली. तो भाकरी व काम मागत होता. पैसे दिले तरीही त्याने ते घेतले नाही. त्या दिवशी घरून जास्तीचा डबा आणण्याचा विचार मनात आला. सहकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. त्याला प्रतिसाद वाढत गेला व आम्ही रोटी बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता जितके लोक भाकरी आणतात. तितक्या जास्त लोकांना जेवण मिळते. अनेकांनी आर्थिक मदतीची तयारी दाखवली. पण आम्ही त्यास नकार देत भाकरी पुरवण्याचाच आग्रह धरला. अनेक निराधार, गरीब लोक पैसे मागण्यास संकोच करतात. त्यांच्या जेवणाची सोय करत आहोत.
अंध, अपंगांसाठी घरपोच
या बँकेतून परिसरातील अंध अपंग व निराधार व्यक्तींना घरापर्यंत नेऊन जेवणाचा डबा पोहोचवला जातो. अनेकदा हे काम भाटिया स्वत: करतात.
घरच्या भाकरी एकत्र करून चालवतात बँक
या बँकेशी जोडले गेलेले व्यापारी घरून येतात आपल्या टिफीनसोबत चार भाकरी व भाजी घेऊन येतात. बाजारातील एका शेडमध्ये स्थापन रोटी बँकेत हे खाद्यपदार्थ जमा केले जातात. तेथे त्यांचे पॅकिंग करून ते कार्टूनमध्ये भरून गरजूंना वाटप केले जाते. सायंकाळच्या वेळीही अशाच प्रकारे भाकरी एकत्र करून त्याचे वाटप केले जाते.