आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भारताची सीमा, येथून पायी किंवा सायकलने येतात विदेशी नागरिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोटमधील हवाई दलाच्‍या तळावर दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. हे दहशतवादी भारतात कसे घुसले, त्‍यांनी शस्‍त्र कशी आणली, असे अनेक प्रश्‍न उपस्‍थ‍ित झाले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com या विशेष वृत्‍तमालिकेतून सांगणार आहे भारताच्‍या आंतरराष्‍ट्रीय सीमेबद्दल. त्‍यातील पहिल्‍या भागात उत्तर बिहारला लागून असलेल्‍या नेपाळच्‍या सीमेबद्दल रंजक माहिती...
एक घर भारतात तर शेजारचे नेपाळमध्‍ये
भारताच्‍या काही राज्‍यांना नेपाळची सीमा लागलेली आहे. त्‍यापैकी बिहारही एक आहे. उत्‍तर बिहारच्‍या काही जिल्‍ह्यांत नेपाळची सीमा लागते. सीमेच्‍या अलीकडे आणि पलीकडे पाहिले तर एकच गाव दिसते. केवळ या ठिकाणी असलेल्‍या कमानीवरील बोर्डमध्‍ये हे दोन वेगवेगळे देश असल्‍याचे लक्षात येते. सीमेपलीकडील नागरिक अगदी सहजतेने पायी-पायी किंवा सायकलने बाजार करण्‍यासाठी भारतात येतात. भारतातील नागरिकही तिकडे जातात. त्‍यांना कधी पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्‍यकता भासत नाही. येथील आणखी एक विशेष म्‍हणजे यातील काही घरांच्‍या शेजारीच असलेली अन्‍य घरे नेपाळमध्‍ये येतात. म्‍हणजे दोन सख्‍खे शेजारी पण त्‍यांचा देश, नागरिकता वेगवेळी आहे. थंडीच्‍या दिवसात तर दोन्‍ही देशातील काही नागरिक एकत्र येत निवांत शेकोटीजवळ बसतात.
कस्टम चेक पोस्ट
दोन्‍ही देशातील नागरिकांना एकमेकांच्‍या देशात येण्‍याजाण्‍यासाठी कुठलीही सरकारी परवानगी घ्‍यावी लागत नाही. परंतु, या ठिकाणी दोन्‍ही देशांचे कस्टम चेक पोस्ट आहे. त्‍यामाध्‍यमातून सैन्‍य दलाचे जवान, पोलिस कर्मचारी येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवतात. प्रसंगी संशयितांची तपासणी करतात.
सीमेवरच आहेत दुकाने
या सीमेवरच अलीकडून आणि पलीकडून तेथील मुख्‍य बाजारपेठ आहे. या ठिकाणी औषधी, किराणा, इलेक्‍ट्रानिक अशी अनेक दुकाने आहेत. दोन्‍ही देशातील नागरिक सहजतेने खरेदीसाठी एकमेकांच्‍या देशात जातात येतात. अनेकांचे जवळचे नातेवाईक परराष्‍ट्रात म्‍हणजे नेपाळमध्‍ये हाकेच्‍या अंतरावर राहतात.
काही शेतजमिनी दुसऱ्या देशात
दोन्ही सीमा भागातील गावांमध्ये लग्नकार्येही होत असतात. काहींच्या जमिनी नेपाळमध्ये आणि नेपाळमधील काहींच्‍या भारतात असल्याने ते रोज शेती करण्यासाठी जातात-येतात.

मधेशी आंदोलनामुळे सीमेवर गार्ड
बिहारमधील पूर्व चंपारणमधील जिल्‍ह्यातील रक्‍सौल हे गाव भारत-नेपाळची सीमा रेषा आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळमध्‍ये नवीन संविधान लागू झाले. त्‍यामुळे नेपाळमधील मधेशी समुदायाने (मूळ बिहारी-यूपी लोक) यांनी आपल्‍याही योग्‍य प्रतिनिधित्‍व द्यावे, या मागणीसाठी या सीमेवर आंदोलन केले. त्‍याला दडपून टाकण्‍यासाठी नेपाळी पोलिसांनी गोळीबार केला. यात एक बिहारी युवक ठार झाला होता. या आंदोलनामुळे या सीमेवर गार्ड वाढवण्‍यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा बिहार-नेपाळ सीमेच्‍या काही निवडक फोटोज..
बातम्या आणखी आहेत...