आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्ड द्या, 3000 नकाशे मोफत मिळवा; सरकारने उपलब्ध केले एसजीआयचे नकाशे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्व्हे जनरल ऑफ इंडियाने (एसजीआय) तयार केलेले साधारण ३ हजार नकाशे डाऊनलोड होऊ शकणारी वेबसाइट सरकारने सोमवारी लाँच केली. आधार क्रमांक वापरून प्रत्येक व्यक्ती (http://soinakshe.uk.gov.in/) या पोर्टलवरून दररोज तीन नकाशे डाऊनलोड करू शकेल.

एसजीआयने सोमवारी अडीचशे वर्षे पूर्ण केले. यानिमित्त विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन म्हणाले, केवळ भारतीयांसाठी नकाशे उपलब्ध व्हावेत यासाठी आधारची सक्ती करण्यात आली आहे. एसजीआयकडे नकाशे आणि नकाशाशास्त्रीय दस्तऐवजाची जबाबदारी आहे. त्यांनी सर्वांत पहिल्यांदा १७८३ मध्ये “मॅप ऑफ हिंदुस्तान’ प्रसिद्ध केला होता. यामध्ये भारतासह पाकिस्तान, बर्मा आताचा म्यानमार, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या काही भागाचा समावेश होता. एसजीआयकडे साधारण ५ हजार नकाशांचा संग्रह आहे. त्यातील ३००० नकाशे नागरिकांना उपलब्ध आहेत. १७०० नकाशे डाऊनलोडिंगसाठी लवकरच उपलब्ध होतील. 
बातम्या आणखी आहेत...