आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपब्लिक डे : पहिल्‍यांदाच करणार फॉरेन आर्मी परेड, फ्रान्‍सचे राष्‍ट्रपती गेस्‍ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात पोहोचलेले फ्रान्‍सचे सैनिक. - Divya Marathi
भारतात पोहोचलेले फ्रान्‍सचे सैनिक.
नवी दिल्ली - 26 जानेवारीला राजपथावर भारतीय सैन्‍यासोबतच यावर्षी फ्रान्‍सचे सैन्‍यही परेड करणार आहे. भारताच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच प्रजासत्‍ताक दिनाच्‍या कार्यक्रमात परराष्‍ट्राचे सैन्‍य भाग घेत आहे. विशेष म्‍हणजे फ्रान्‍सचे राष्‍ट्रपती फ्रांसुआ ओलांद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. गत वर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आले होते.
भारतात का आले फ्रान्‍सचे सैनिक...
- फ्रान्‍स आर्मीची एक तुकडी राजस्थानमध्‍ये ( महाजन फायरिंग रेंज) पोहोचली आहे.
- येथे भारत आणि फ्रान्‍स या दोन्‍ही देशाचे सैनिक एकत्र युद्ध सराव करत आहेत. त्‍याला शुक्रवार, 8 जानेवारीपासून सुरुवात झाली.
- हे सराव शिबिर 16 जानेवारीपर्यंत चालेल.
यापूर्वीसुद्धा आले होत फ्रान्‍सचे राष्‍ट्रपती आणि पंतप्रधान
- यापूर्वीसुद्धा फान्‍सचे राष्‍ट्रपती आणि पंतप्रधान भारताच्‍या प्रजासत्‍ताक दिन सोहळ्यामध्‍ये प्रमुख पाहुणे म्‍हणून आलेले आहेत.
- 1998 मध्‍ये राष्‍ट्रपती आणि 1976 मध्‍ये पंतप्रधान प्रजासत्‍ताक दिनाच्‍या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते.
- या शिवाय फ्रान्‍सचे तत्‍कालीन राष्‍ट्रपती वॅलरी ग्रिसकार्ड हेसुद्धा 1980 च्‍या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...