आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतावर हल्‍ला करण्‍यासाठी आयएस तयार करत आहे सुसाइड बॉम्बर, रिपोर्टमध्‍ये खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्‍या अरीब मजीद याला गेल्‍या वर्षी सीरियाहून परतल्‍यानंतर अटक केली होती. - Divya Marathi
मुंबईच्‍या अरीब मजीद याला गेल्‍या वर्षी सीरियाहून परतल्‍यानंतर अटक केली होती.
नवी दिल्ली- बांग्लादेशमध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्यानंतर भारतातील सुरक्षा एजंसी अलर्ट आहेत. मात्र, एका रिपोर्टने त्‍यांच्‍या चिंतेत आणखी भर घातली आहे. पॅरिस हल्‍ल्‍यानंतर अटक असलेल्‍या एका फ्रेंच दहशतवाद्याने खुलासा केला की, दहशतवादी संगठन आयएस काही भारतीयांना सुसाइड बाम्बर बनण्‍याचे ट्रेनिंग देत आहे. भारतीय एजंसिंनी अशीही शक्‍यता वर्तवली आहे की, बांग्लादेशचे दहशतवादी संगठन जेएमबी आयएसच्‍या मदतीने आसाम आणि बंगालमध्‍ये हल्‍ले करण्‍याची शक्‍यता आहे.
काय आहे प्रकरण..
पॅरिस हल्‍ल्यानंतर एका फ्रेंच नागरिकाला अटक करण्‍यात आले होते. त्‍याचे नाव रेडा हेम आहे. त्‍याने चौकशीच्‍या वेळी माहिती दिली की, त्‍याने सीरियामध्‍ये दहशतवाद्याचे ट्रेनिंग घेतले आहे. हेमच्‍या माहितीनुसार त्‍याने ट्रेनिंगच्‍या वेळी सुमारे 100 विदेशी दहशतवाद्यांना पाहिले होते. त्‍यामध्‍ये काही भारतीय लोकही सहभागी असल्‍याचे त्‍यांने सांगितले. अमेरिकेच्‍या साइट इंटेलिजंस ग्रुपने एका व्‍हिडियोच्‍या आधारावर हीच बाब सांगितली होती.
अशी आहे चाल..
हेमच्‍या माहितीनुसार, त्‍याचे ट्रेनिंग सीरियाच्‍या होम्स प्राविंसमध्‍ये झाले होते. तेथे इतर देशाचे लोकही होते. त्‍यामध्‍ये भारतीय, चीनी, अमेरिकी आणि काही ब्रिटीशही सहभागी होते. या लोकांना दुस-या देशात जाऊन दहशतवाद्याचे ट्रेनिंग दिले होते. हेमच्‍या माहितीनुसार आयएसने एक फॉरेन विंगही बनवली आहे. त्‍याचा चीफ बगदादीचा प्रवक्‍ता अबू मोहम्मद अल अदनानी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, 500 भारतीय आयएसच्‍या संपर्कात..
बातम्या आणखी आहेत...