आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French President Francois Hollande Chandigarh Visit Live

चंदीगडमधून सुरु होईल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांचा दौरा, मोदींसह पाहातील रॉकगार्डन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड/नवी दिल्ली - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या तीनदिवसीय दौऱ्याची सुरुवात चंदिगड येथून होत आहे. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील असतील. त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान पोहोचत आहेत.

ओलांद यांचे रविवारी दुपारी 1 च्या सुमारास चंदिगडमध्ये आगमन होईल. त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही असेल. रॉक गार्डन, सरकारी संग्रहालय आणि कला दालनाला उभय नेते भेट देतील. राष्ट्रप्रमुख दौऱ्यावर असले तरी चंदिगडमधील वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्यामुळे वैताग होणार नाही. उभय नेते किमान 15 मिनिटे सोबत असतील. सायंकाळी ते दिल्लीला रवाना होतील. दरम्यान, भारत आणि फ्रेंच यांच्यात दहशतवादाच्या विरोधात परस्परांना सहकार्य वाढवण्यासंबंधीचा करार होण्याची शक्यता आहे.

पॅरिस आणि पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उभय देशांतील चर्चेला महत्त्व आहे. दरम्यान, गेल्या वर्षी फ्रान्सने चंदिगड, नागपूर आणि पुडुचेरी या तीन शहरांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे चंदिगडचा देशातील अव्वल २० शहरांत समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

फ्रान्सवा आेलांद यांचा भारत दौरा द्विपक्षीय संबंधाला बळकटी देणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्रेंच लष्कर तसेच बँड देखील राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरेल. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी भारतात येणारे ते पाचवे फ्रेंच नेते ठरले आहेत. यापूर्वी 1976, 1980, 1998, 2008 मध्ये फ्रेंच नेते पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.