आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Today Aam Adami Raj On Delhi, All Ministers Reach On Ramlila Ground By Metro

आजपासून दिल्लीवर ‘आम आदमी राज’, केजरीवालसह सर्व मंत्री मेट्रोने येणार रामलीला मैदानावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शनिवारी दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार बनणार असून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत 6 मंत्रीसुद्धा शपथ घेतील. दुपारी 12 वाजता सुरू होणा-या शपथविधी सोहळ्यासाठी केजरीवालसह संपूर्ण कॅबिनेट मेट्रो रेल्वेने रामलीला मैदानावर पोहोचणार आहे. या वेळी एकही मंत्री लाल दिव्याची गाडी वापरणार नाही.
1993 मध्ये दिल्ली विधानसभा गठित झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या शपथविधी सोहळा होणार असून अरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, ‘शपथविधी सोहळा सार्वजनिक व सर्वांसाठी खुला असून कोणतेही पासेस देण्यात आले नाहीत. सोहळ्यात येणा-या सर्व लोकांचे येथे स्वागत आहे. या वेळी माझे कुटुंबीयसुद्धा लोकांच्या मध्येच बसतील.’ केजरीवाल यांच्या कौशांबी येथील घरासमोर मनीष सिसोदिया यांनी सांगितले, व्हीआयपी संस्कृती नष्ट करण्यासाठी आम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार आहोत.
मंत्रिमंडळातील मंत्री सोमनाथ भारती म्हणाले, शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही विशेष प्रकारचे कपडे घालणार नाहीत, जे नियमित वापरतो तसाच पोशाख या वेळीसुद्धा राहील. आमच्या परिवारातील सदस्यांसाठीसुद्धा विशेष जागा नसेल. सामान्य जनतेतच ते बसतील.
सीएनजी भाववाढ : कंपन्यांनी धीर धरावा : केजरीवाल
राजधानी दिल्लीत सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आल्यामुळे ऑटोरिक्षा संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली असून असे न केल्यास 7 जानेवारीपासून संप करण्याचा इशाराही दिला आहे.