आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Frustrated Women Puts Her Mother In Law For ‘SALE’ On Internet

सासू विकणे आहे... वेबसाइटवर झळकली जाहिरात - मदर इन लॉ इन गुड कंडीशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सासु-सूनेचे भांडण म्हणजे घरोघरी मातीच्या चुली याप्रमाणे आहे. मात्र काही ठिकाणी भांड्याला भांडे लागण्याचे आवाज दूरपर्यंत येतात आणि आता तर ते जाहिरातीतून दिसून आले आहे. एका नाराज सूनेने सासूच्या विक्रीची ऑनलाइन जाहिरात दिली आहे. अशा प्रकारची देशातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. ही जाहिरात खरेदी-विक्री करणाऱ्या 'फायदा डॉटकॉम' वेबसाइटवर देण्यात आली आहे. यात एका वृद्ध महिलेचा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे. जाहिरात देणाऱ्या महिलेने वृद्ध महिला आपली सासू असल्याचे सांगत टॅग लाइनमध्ये लिहिले आहे - 'मदर इन लॉ इन गुड कंडिशन'. या सासू आणि सून कुठल्या आहेत याचा जाहिरातीवर उल्लेख नाही. मात्र जाहिरातीवरुन वादंग होण्याचे लक्षात आल्यानंतर काही मिनीटांतच वेबसाइटने जाहिरात हटवली.
काय होते जाहिरातीत
जाहिरातदार महिलेने सासूबद्दल कुचकटपणे टिप्पणी करताना लिहिले-
आवाज - इतका गोड की आसपासच्या ऐकणाऱ्यांचाही प्राण जाईल.
वय - 60 वर्षांच्या आसपास.
कंडिशन - फंक्शनल.
किती वर्ष जूनी - पाच वर्षे.
भोजनाची कट्टर टिकाकार - सासू रोजच्या जेवणाची पहिली टिकाकार असते. तुम्ही कितीही चांगले भोजन तयार करा त्यात ती चूक शोधून काढतेच.
स्तुती - ती चांगली सल्लागार आहे. ती हे सांगण्यास कधीही विसरत नाही की तू यापेक्षा अधिक चांगले केस करु शकते.
किंमत - काही नाही.
मोबदल्यात पाहिजे - डोके आणि मन शांत करणारी काही पुस्तके.
वेबसाइट म्हणणे काय
फायदा डॉटकॉमचे सह-संस्थापक विपुल पालीवाल म्हणाले, आम्ही अशा खोडकर जाहिरातींवर कायम नजर ठेवून असतो. ही पहिली वेळ आहे की अशी जाहिरात काही वेळासाठी प्रसिद्ध झाली. आमच्या टीमच्या लक्षात आल्यानंतर फक्त 10 मिनिटांत जाहिरात वेबसाइटवरुन काढून टाकण्यात आली.
याआधीही अशी जाहिरात
क्विकर डॉटकॉम या वेबसाइटच्या पेट्स अँड पेटकेअर सेक्शनमधअये गेल्या वर्षी एका पत्नीने तिच्या पतिचा फोटो अपलोड केला होता. मात्र वेबसाइटच्या लक्षात आल्यानतंर तो काढण्यात आला.
आयटी कायद्यानुसार काय होऊ शकते
- कोणाचाही फोटो त्यांच्या परवानगीशिवाय मोड-तोडकरुन सादर करणे आणि बदनामी करणे आयटी कायदा-2000च्या कलम 66 सी नुसार गुन्हा आहे.
- यात तीन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद.
- जर अश्लिल फोटो असेल तर तीन वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड होऊ शकतो.
- तसेच, अशा जाहिराती आणि कंटेट 36 तासात वेबसाइटवरुन काढून टाकण्याची जबाबदारी संबंधित वेबसाइटची असते. अन्यथा त्यांच्यावरही कारवाईची तरतूद कायद्यात आहे.