आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एफएसएसएआय करेल मॅगी प्रकरणाची चौकशी, तक्रार नोंदवल्यास खटला : पासवान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेस्लेच्या जगप्रसिद्ध ‘मॅगी’ या नूडल ब्रँडमध्ये शिसे आणि एमएसजी हे टेस्ट एनहान्सर निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आढळल्याच्या प्रकरणाची ‘गंभीर दखल’ सरकारने घेतली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (एनसीडीआरसी) तक्रार दाखल झाली तर मॅगीच्या विरोधात खटलाही दाखल केला जाईल, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कामकाज मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी दिली.
माधुरीला नोटीस
हरिद्वार | अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेला मॅगीच्या जाहिरातीवरून हरिद्वारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. नोटिसीला १५ दिवसांत उत्तर न दिल्यास खटला दाखल करण्यात येईल, असा इशाराही विभागाने माधुरीला दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...