आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची जंतरमंतरवर जोरदार निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया)चा वाद आता दिल्लीपर्यंत गेला आहे. संस्थेच्या ८० विद्यार्थ्यांनी पुण्याहून दिल्लीला जाऊन सोमवारी जंतर-मंतरवर निदर्शने केली. अनेक संसद सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले.
विद्यार्थ्यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असूनही हे निदर्शन करण्यात आल्याचा आरोप सरकारने केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या मुद्द्याला राजकीय रंग देत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.

गजेंद्र चौहान यांची ९ जून रोजी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांना या पदावरून हटवण्यासाठी १२ जून रोजी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. मात्र, अद्याप सरकारने चौहान यांना हटवल्याचे म्हटले नाही. आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आपण अनेक राजकीय पक्षांना पत्र पाठवले. सरकारला विनंतीपत्रही पाठवले. नियुक्तीत पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली. मात्र, केवळ राहुल गांधी यांनी समर्थन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सदस्यांचे समर्थन
काँग्रेसचे संसद सदस्य राज बब्बर, जदयूचे के. सी. त्यागी यांनी विद्यार्थ्यांसोबत निदर्शनात भाग घेतला. त्यांनी मोहंमद सलीम (माकप), डी. राजा (भाकप), राजीव शुक्ला (काँग्रेस), डी. पी. त्रिपाठी (एनसीपी) यांच्यासह संयुक्त निवेदन जारी केले. यात प्रदर्शन योग्य आहे.
बातम्या आणखी आहेत...