आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FTII चे विद्यार्थी धडकले संसदेवर; चौहान निवड प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली – पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्‍यक्षपदी केंद्र सरकारने नियमबाह्यरीत्‍या गजेंद्र चौहान यांची नियुक्‍ती केल्‍याचा आरोप होत आहे. त्‍यामुळे चौहान यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी दीड महिन्‍यांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दरम्‍यान, या मागणीची पूर्तता व्‍हावी, यासाठी आज (सोमवार) विद्यार्थ्‍यांनी संसदेवर मोर्चा काढला. यासाठी पुणे येथून 80 विद्यार्थी दिल्‍लीत पोहोचले आहेत. सुरुवातीला त्‍यांनी निदर्शने केली.
अभिताभ, रजनीकांत यांना डावलून निवड
या पदासाठी चौहान यांच्यासह अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा, राजू हिरानी, जया बच्चन, अडूर गोपालकृष्णन, रमेश सिप्पी, गोविंद निहलानी आणि आमिर खान अशा ख्‍यातकीर्त नावांचाही विचार करण्यात आला होता. मात्र, शासनाने चौहान यांची निवड केल्‍याची माहिती माहिती अधिकारातून देण्‍यात आली आहे.
अनेकांनी दिला आंदोलनाला पाठिंबा
गजेंद्र यांना या पदावरून हटवावे अशी मागणी विद्यार्थ्‍यांसह अनेकांनी केली. यामध्‍ये अभिनेता अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, सलमान खान यांच्‍यासह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे.