आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल 1.12 तर डिझेल 1.24 रुपयाने स्वस्त, आजपासून रोज सकाळी 6 वाजता बदलणार दर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/अाैरंगाबाद - तेल कंपन्यांनी आपल्या शेवटच्या पाक्षिक आढाव्यात पेट्रोल 1.12 रुपये, तर डिझेल 1.24 रुपयाने स्वस्त केले. आजपासून दररोज पहाटे 6 वाजता (16 जून) पेट्रोल व डिझेल दरांत दररोज बदल होणार आहेत. औरंगाबादेच्या डीलर्सनुसार यामुळे इंधनटंचाई होणार नाही. कोणत्या पंपाला किती पेट्रोल, डिझेल दिले याची नोंद कंपनीकडे असते. रोज साठ्याचा अहवाल कंपनीला ऑनलाइन द्यावा लागतो.
 
साठा असूनही नसल्याचे दाखवल्यास कंपनी 50 हजार ते एक लाख रुपये दंड आकारते. तीन वेळा दंड आकारणी झाल्यावर चौथ्या वेळेस पंपचालकाने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यास परवानाच रद्द होतो. शिवाय जिल्हा पुरवठा अधिकारी कोणत्याही वेळेत पंपावर किती साठा आहे याची तपासणी करू शकतात. त्यामुळे भाव घटल्यावर इंधनटंचाई होणार नाही, असे पंपचालक संदीप घंटे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...