आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती ते गुजरात सीमेपर्यंत चाैपदरी रस्ता, ७,५२८ काेटी रुपये मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरीला वाहतूक लक्षात घेता हा मार्ग चाैपदरी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ समितीने गुरुवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने या महामार्गासाठी ७ हजार ५२८ काेटी रुपये मंजूर केले अाहेत.
अमरावती ते चिखली, चिखली ते फागणे आणि फगने ते गुजरात सीमेपर्यंत "राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६' चाैपदरी केला जाणार अाहे. लवकरच या महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम खासगी सहभागातून सुरू करण्यात येणार अाहे. ज्या कंपनीला हे काम दिले जाईल त्यांच्याकडेच डिझाइन, निधीचा विनियाेग, निर्मिती अादी बाबींचे सर्वाधिकार राहतील. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंपनी सरकारकडे मार्ग हस्तांतरित करेल.

रस्त्यांच्या रुंदीकरणाची सुरुवात तीन ठिकाणांहून हाेत असली तरी एकूण ४९४ कि.मी. मार्गाचे चाैपदरीकरण हाेणार अाहे. ७ हजार ५२८ काेटी रुपये ही या महामार्ग निर्मितीची अंदाजित किंमत अाहे मात्र, रस्ता तयार हाेताच टाेलच्या माध्यमातून हा निधी वसूल केला जाणार अाहे. अमरावती ते गुजरातपर्यंतचा हा मार्ग अधिक रहदारीचा असल्याने या प्रकल्पाला लागलेला निधी वसूल हाेईल याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास अाहे. या मार्गाच्या निर्मितीसाठी मार्च २०१२ मध्ये मंजुरी देण्यात अाली हाेती. अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते गुजरात पर्यंतच्या या मार्गाचे चाैपदरीकरण हाेणार हाेते, परंतु जमीनीचे अधिग्रहण न हाेऊ शकल्याने हे काम थंडबस्त्यात गेले त्यामुळे ज्या कंपनीला हे काम देण्यात अाले हाेते त्या एल. एन. टी इन्फ्रास्टक्चरने या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी माघार घेतली हाेती.

हे आहेत मार्ग
>अमरावती ते चिखली- १९४ कि.मी. : २ हजार ७५४ काेटी रुपये
> चिखली ते फागणे - १५० कि.मी. : २ हजार ४५३ काेटी रुपये
> फागणे ते गुजरात सीमा - १५० कि.मी. : २ हजार ३२१ काेटी रुपये
बातम्या आणखी आहेत...