आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती ते गुजरात सीमेपर्यंत चाैपदरी रस्त्यासाठी केंद्राकडून ७,५२८ काेटी मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 - Divya Marathi
फाईल फोटो - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6
नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरीला रहदारी लक्षात घेता हा मार्ग चाैपदरी करण्याची मंजुरी अाज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अर्थ समितीने दिली. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र माेदी अाहेत. या महामार्गासाठी ७ हजार ५२८ काेटी रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत.

अमरावती ते चिखली, चिखली ते फगने आणि फगने ते गुजरात सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा चाैपदरी केला जाणार अाहे. लवकरच या महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम खासगी सहभागातून सुरु करण्यात येणार अाहे. ज्या कंपनीला हे काम दिले जाणार अाहे त्यांच्याकडेच डिझाइन, निधीचा विनियाेग, निर्मिती अादी बाबींचे सर्वाधिकार राहतील. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सरकारकडे मार्ग हस्तांतरीत करण्यात येणार अाहे. रस्त्यांच्या रुंदीकरणाची सुरुवात तीन ठिकाणाहून हाेत असली तरी एकूण ४९४ कि.मी. मार्गाचे चाैपदरीकरण हाेणार अाहे. ७ हजार ५२८ काेटी रुपये ही या महामार्ग निर्मितीची अंदाजित किंमत अाहे मात्र, रस्ता तयार हाेताच टाेलच्या माध्यमातून हा निधी वसूल केला जाणार अाहे. अमरावती ते गुजरातपर्यंतचा हा मार्ग अधिक रहदारीचा असल्याने या प्रकल्पाला लागलेला निधी वसूल हाेईल याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास अाहे. या मार्गाच्या निर्मितीसाठी मार्च २०१२ मध्ये मंजुरी देण्यात अाली हाेती. अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते गुजरात पर्यंतच्या या मार्गाचे चाैपदरीकरण हाेणार हाेते परंतु जमीनीचे अधिग्रहण न हाेऊ शकल्याने हे काम थंडबस्त्यात गेले त्यामुळे ज्या कंपनीला हे काम देण्यात अाले हाेते त्या एल. एन. टी इंफ्रास्टक्चरने या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी माघार घेतली हाेती.

अाज कॅबिनेटने दिलेल्या मंजुरीत अमरावती ते चिखली या १९४ कि.मी. साठी २ हजार ७५४ काेटी रुपये, चिखली ते फगने १५० कि.मी. साठी २ हजार ४५३ काेटी रुपये आणि फगने ते गुजरात सीमेपर्यंत १५० कि.मी. साठी २ हजार ३२१ काेटी रुपयांचा खर्च अपेिक्षत अाहे.
बातम्या आणखी आहेत...