आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामाजिक कार्याला कुबेरांचा मोठा हातभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक पातळीवर गर्भश्रीमंतांमध्ये भारतीयांचे प्रमाण खूप अधिक असून त्यांनी आपल्या संपत्तीचा उपयोग मायदेशातील शिक्षण, आरोग्य, मुलांसाठी केल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण 90 टक्के असून जगात सर्वाधिक आहे.

‘वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट 2014’ ने जारी केलेल्या एचएनडब्ल्यूआय या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कॅपगेमिनी आणि आरबीसी वेल्थ मॅनेजमेंट यांच्या वतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. वैयक्तिक स्वरूपातील संपत्तीचे मालक असलेल्या भारतातील 90.5 टक्के व्यक्तींची समाजसेवेची तयारी आहे. त्यानंतर चीन (89.4 टक्के), इंडोनेशिया (89.2) अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी आहे. हाँगकाँग (82.1 टक्के), मलेशिया (81.1 टक्के), मेक्सिको (77.1 टक्के), रशिया (71.8 टक्के), सिंगापूर (70.1 टक्के), दक्षिण आफ्रिका (68.1 टक्के) यांचा अव्वल दहा देशांत समावेश झाला आहे. जगभरातील गर्भश्रीमंतांनी मायदेशातील आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यासाठी त्यांच्याकडून मोठा निधी देण्यात आला. त्यानंतर शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या गर्भश्रीमंतांमध्ये हा कल दिसून आला आहे.