आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Funding Row: Arvind Kejriwal Dares Govt To Arrest Him

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन कोटींच्या निधीने अरविंद केजरीवालांना घाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निवडणूकपूर्व सर्व्हेक्षणात भाजपपेक्षा आम आदमी पार्टी आगेकूच करीत असल्याचे दाखविल्याने भाजपने आपली जोरात मोर्चेबांधणी केली असून येत्या दोन दिवसात सर्व्हेक्षणाचे चित्र पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल अवाम या संस्थेने आम आदमी पार्टीला मिळालेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीवरून समाधानकारक खुलासा करू शकली नाही, उलट यामागे भाजपचा हात असल्याचे आरोप करताना आम आदमीचे नेते भांबावलेले दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम दिल्लीत रोहिणी येथील जपानी पार्कमध्ये प्रचार सभेत केजरीवाल यांना चांगलेच धारेवर धरले. बनावट कंपन्यांकडून केजरीवाल निधी गोळा करीत आहे.

चूक झाली तर देश एकदा क्षमा करेल परंतु दगाबाजी केली तर त्याला कधीही माफ केल्या जाऊ शकत नाही. केजरीवाल यांनी खोटारडेपणाच्या संपूर्ण मर्यादा ओलांडल्या आहेत. केजरीवालांना त्यांच्या पार्टीकडे कोठून निधी येतो हेही माहिती नसेल तर या देशातील नागरीकांची त्यांच्याकडून फसवणूक केली जात असल्याचा आरोप मोदींनी केला. स्वच्छ प्रतिमा आणि काळापैशाच्या नावाने टाहो फोडणार्‍यांकडे मध्यरात्री कोट्यवधीचा निधी येतो; असा ढोंगीपणा असलेला व्यक्ती दिल्लीचे वाटोळे करेल, अशी टिकाही त्यांनी केली.