आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे रडले होते राहुल गांधी, देशात प्रथमच झाले होते अंत्यविधीचे Live टेलिकास्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 31 ऑक्टोबर 1984 च्या सायंकाळपर्यंत संपूर्ण देशात बातमी पसरली होती की पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली आहे. सायंकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव तीनमूर्ती भवन येथे आणण्यात आले होते. श्रद्धांजली देण्यासाठी लागलेली रांग तीन दिवस संपली नव्हती. भारतात एखाद्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याची ती पहिलीच वेळ होती. तेव्हा बहुतेक सर्वांकडे ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होते. राजीव गांधींनी आईच्या चितेला मुखाग्नि दिला, जनतेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर आजीच्या वियोगाने छोटा राहुल वडिलांच्या छातीला बिलगून स्फूंदून-स्फूंदून रडू लागला.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अंत्ययात्रा 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरु झाली होती. त्यांच्या निवासस्थानापासून राजघाटपर्यंत लोकांची गर्दी होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. यमुनेच्या किनाऱ्यावर इंदिरा गांधींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी जगभरातील राष्ट्राध्यक्ष भारतातील या पोलादीकन्येला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. ज्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आता त्याला शक्तिस्थळ म्हटले जाते.
1982मध्ये लोकांनी पाहिला टीव्ही
भारतामध्ये टीव्ही सर्वत्र झाला 1982 मध्ये. त्यावेळी भारतात एशियाड गेम्स होते. इंदिराजींनी देशातील दुरदर्शनचा विस्तार केला, त्यामुळे सर्वसामान्यांना एशियाड गेम्स पाहाता आले. त्याआधी ही सुविधा देशातील काही मोजक्या शहरांमध्येच होती. एशियाड गेम्सनंतर दोन वर्षांनीच इंदिराजींची हत्या झाली. भारत सरकारने सलग तीन दिवस इंदिराजींचे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण केले होते.

अघोषित संचारबंदी सारखी स्थिती
ज्या दिवशी इंदिराजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याचे थेट प्रक्षेपण सुरु होते. सर्वांच्या नजरा मिळेल तिथे टीव्ही स्क्रिनवर लागल्या होत्या. ज्यांच्या घरी टीव्ही होते त्यांच्या घरात लोकांची गर्दी होती. त्यादिवशी जणू देशात अघोषित संचारबंदी होती. रस्त्यावर चिट-पाखरू दिसत नव्हते.

टीव्ही निवेदिकेला ऑन स्क्रिन कोसळले रडू, पहिल्यांदा दिसली ब्रेकिंग न्यूज
इंदिराजींच्या हत्येची अफवा 31 ऑक्टोबरच्या दुपारपासूनच पसरली होती. मात्र त्या वृत्तावर लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यावेळी दुरदर्शनचे प्रसारण सायंकाळी 6 वाजता सुरु होत होते. 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुरदर्शनचे प्रसारण सुरु झाले तेव्हा सर्वात पहिली दुरदर्शनवर ब्रेकिंग न्यूज लिहून आले आणि नंतर बातम्या सुरु झाल्या होत्या. सर्वांच्या परिचीत वृत्त निवेदिका सलमा सुल्तान यांनी इंदिरा गांधींच्या हत्येची बातमी सांगितली आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फूटला. ऑन स्क्रिन त्यांच्या डोळ्यातू अश्रू वाहात होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...