आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Political Cartoons Election 2014 New Delhi Latest Hindi Marathi

PICS: व्‍यंगचित्रांची किमयाच न्‍यारी, ज्‍यामुळे कळेल राजकारणातील \'स्‍वारी\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशामध्‍ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. चौकाचौकांमध्‍ये राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत.कोणाला पक्षाने टिकीट नाकारले, कोणाला टिकीट दिले, कोणत्‍या नेत्‍याने बंडखोरी केली, तर कोणत्‍या नेत्‍याने पक्षांतर केले, अशा खमंग चर्चांना उधाण आले आहे. चावडीवर राजकीय गप्‍पांचे फड रंगत आहेत. तर ट्विटर आणि फेसबुकवर तरुणाईला आकर्षित करण्‍यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळे डावपेच आखत आहे. सोशल नेटवर्क साईट्सवर राजकारणाने रंग भरले आहेत. याला व्‍यंगचित्र माध्‍यमही अपवाद नाही.

पक्षाच्‍या प्रचारासाठी विविध सेलिब्रिटींची भंबेरी उडते आहे. पैसे मिळतील तिकडे अभिनेत पळताना दिसत आहेत. तर कित्‍येक राजकीय पक्षांच्‍या सभांना भाडेतत्‍त्‍वावर कार्यकर्त्‍यांची फौज गोळा होत आहे. या सर्व घटणांचे चित्रे व्‍यंगचित्र माध्‍यमामध्‍ये अतिशय परखडपणे उमटले आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला दाखविणार आहोत असे व्‍यंगचित्रे जे पाहताच तुम्‍हाला प्रत्‍येक राजकीय नेत्‍याची अस्‍सल जाणीव होईल. ते पाहताचा आपण हसून हसून लोटपोट व्‍हाल.

व्‍यंगचित्र पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....