आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Video Of A Girl And A Boy Stuck Under Car On Road

VIDEO: तरुणाला नाही मिळाली मदत, तरुणीसाठी जमली गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फनी व्हिडिओ सत्य परिस्थिती मांडणारा आहे. रस्त्यावर मदत करण्यासाठी लोकांची काय मानसिकता असते, यातून आपल्याला दिसून येईल. वास्तवदर्शी व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काही प्रश्न पडतील. त्यावर निश्चितच विचार करा.
कदाचित तुमच्यावरही अशा स्वरुपाचा प्रसंग गुदरलेला असावा. या व्हिडिओतून निश्चितच तुम्हाला धडा मिळेल. तुम्ही विचार करायला लागाल. या व्हिडिओच्या सुरवातीला एका कारखाली एक तरुण दिसतो. तो कारमधील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी त्याला कुणीही काही विचारत नाहीत. मदत करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. असा बराच वेळ निघून जातो.
त्यानंतर तो पार्लरमध्ये जाऊन तरुणीचा वेश धारण करतो. तिच्यासारखा मेकअप करतो. मॉडर्न आऊटफिट ठेवतो. कारखाली जाऊन ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणजेच आताच्या तिला बघून बघ्यांची गर्दी जमते. जो तो मदतीसाठी पुढे सरसावतो. मॅडम काही मदत हवी का... तुम्हाला काही मदत हवी का... कारला काय झाले... असे अनेकानेक मदतीचे प्रस्ताव पुढ्यात येऊन पडतात.
हा वास्तवदर्शी व्हिडिओ बघा, पुढील स्लाईडवर... विचार करा... आणि विचार करायला लावा...