आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari Dismisses Reports On Listening Devices At His Home

गडकरींच्या घरात हेरगिरी उपकरणाच्या बातमीचे राजकारण; स्वामी देणार खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: नितिन गडकरी

नवी दिल्‍ली -
केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरींनी आपल्या घरात आवाज रेकॉर्ड करणारी अत्युच्च क्षमतेची उपकरणे (हाय पावर लिसनिंग डिव्हाईस) लावल्याच्या बातम्यांचा विरोध केला असला तरीही हे प्रकरण आता राजकीय वळण घेताना दिसत आहे. एकीकडे एका वृत्तपत्रात छापून आलेल्या अहवालाला गडकरींनी फेटाळून लावले आहे, तर, दुसरीकडे भाजपचे नेते सुब्रम्यण्यम स्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात गडकरींच्या घरात आवाज रेकॉर्ड करणारे उपकरण लावल्याचे सांगितले आहे. स्वामी या संदर्भात रविवारी रात्री एका वृत्त वाहिनीवर याबद्दलचा खुलासा करू शकतात. स्वामी यांनी ट्वीटरवर लिहिले आहे की, Bugs were planted in Gadkari's house last October. Who did it to my friend? Watch me on News X tonight at 9 pm. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार, स्वामी याप्रकरणी युपीए सरकारकडे इशारा करत म्हणाले की, युपीए सरकारच्या मर्जीशिवाय असे घडणे शक्यच नाही.

मोदींना देण्यात आली माहिती?
गडकरींच्या घरात 'आवाज रेकॉर्ड करणारी अत्युच्च क्षमतेची उपकरण' लावल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना त्वरीत देण्यात आली होती असा दावा एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केला आहे. याशिवाय गडकरींच्या घरात या उपकरणांना शोधण्याचे आणि ते उपकरण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, या प्रकरणाती सत्य सर्वांच्या समोर यायला हवे अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांनी या प्रकरणी गडकरी आणि सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे. तर कोणीतरी जवळचाच व्यक्तीच गडकरींच्या घरात जाऊ शकतो असे 'डीएमके'ने म्हटले आहे.
सोशल मेडियावर गोंधळ
इंग्रजी वृत्तपत्र द संडे गार्डियनच्या रविवारच्या अंकात हा अहवाल छापून आल्यानंतर सोशल मेडियावर खळबळ उडाली. अनेक युजर्सने #ModiMinisterBugged, #SpyingOnTeamModi हॅशटॅगने हजारो ट्वीट केले. याट्वीटमधून "केवळ गडकरीच गुप्तहेरांच्या निशाण्यावर आहेत की, मोदी सरकारचे इतर मंत्र्यांचीही जासूसी होत आहे?" असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर काही लोकांनी "जर जासूसी उपकरणच लावायचे असतील तर, गडकरीच का?" असाही प्रश्न विचारला आहे.

काय आहे अहवाल
इंग्रजी वृत्तपत्र द संडे गार्डियनच्या अहवालामध्ये, गडकरींच्या 13 तीन मूर्ति लेनवर असलेल्या निवासस्थानात हाय पावर लिसनिंग डिव्हाईस (उच्च क्षमतेचे श्रवण यंत्र, ज्याचा उपयोग संभाषण ऐकण्यासाठी केला जातो) सापडले आहे. ही माहिती मिळताच या उपकरणांना शोधणे आणि नष्ट करण्याचे काम सुरू झाले. मात्र तपासात असे कोणतेही यंत्र सापडले नाही. या अहवालात अशा उपकरणांचा वापर पश्चिमेकडील देशांमध्ये जासूसी संघटना उदा. सीआयए आणि एनएसए करत असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वीही आल्या होत्या जासूसीच्या बातम्या
वाशिंग्टन पोस्टवृत्तपत्रातून 30 जूनला एडवर्ड स्नोडनने अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना भाजपा समवेत जगातील अनेक राजकीय पक्षांच्या कामकाजाविषयी माहिती मिळवत आहेत. त्यावेळी भारताने अमेरिकेकडे याबद्दल आक्षेप नोंदवला होता. यापूर्वी जून 2011 ला आलेल्या बातम्यांमध्ये अर्थमंत्रालयाच्या कार्यालयामध्ये जासूसी उपकरणे लावण्यात आली होती. त्यावेळी अर्थ मंत्रालट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे होते. ही याघनेनतंर एका वर्षातच संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांच्या कार्यालयातही अशा प्रकारची जासूसी उपकरणे लावण्यात आल्याची बातमी आली होती.

पुढे पाहा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काय ट्वीट केले.