आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gadkari Takes Swipe At AAP: Confused Party, Defused Netas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत भाजपला होतोय आम आदमी पार्टीचा ताप!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातूनही काही खासदार दिल्लीत प्रचाराला आलेले आहेत. शिवाय नितीन गडकरी, पीयूष गोयल, हंसराज अहिर, प्रकाश जावडेकर आदी नेते विविध मतदार संघात प्रचार सभा घेत आहेत. आज िदवसभर प्रचाराने चांगलाच वेग घेतल्याचे चित्र होते. ५ फेब्रुवारीपर्यंत प्रचार शिगेला पोहोचलेला असेल.

भाजपकडून अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येत असले तरी या बाबी भाजपच्याच अंगलट येत आहेत. आज भाजपच्या जाहिरातींमध्ये केजरीवालांना उपद्रवी गोत्र असे संबोधून भाजपने स्वत:चेच हसे केले आहे. दिल्लीची पहिली पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी असली तरी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी या केजरीवालांपेक्षा बर्‍याच मागे पडल्याचे वस्त्यावस्त्यांमधून मदतारांचा वेध घेतला असता दिसून येते. आपच्या कार्यकर्त्यांना थेट लोकांशी संवाद साधण्याचे तंत्र जमले मात्र भाजपला यात मर्यादा असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरात केजरीवाल यांनी दीडशे सभा पार पाडल्यात. प्रत्येक विधानसभेचा दोन ते तीन वेळा दौरा केला.

आप कन्फ्युज्ड नेते डिफ्युज्ड
सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांची पार्टी कन्फ्युज्ड असून त्यांचे नेते डिफ्युज्ड असल्याची टीका केली. गडकरी पुढचे तीन िदवस महाराष्ट्रातील नेत्यांना प्रचाराला जुंपवणार आहेत. मराठी बहुल भागात त्यांच्या सभा लावल्या जात आहेत. स्वत: गडकरी विविध ठिकाणी सभा घेत आहेत. भाजपचे सरकार हमखास येईल आणि दिल्लीचा विकास होईल हे सांगताना दिल्लीला जोडणारे रस्ते, उडाण पूल, ई-रिक्षा, महामार्गाची निर्मिती याचा पाढा वाचला. सांगली खासदार संजयकाका पाटील यांनी करोलबाग आणि राजेंद्र नगर येथे जाऊन मराठी व्यावसायिकांची भेट घेतली.