आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 जवानाच्या अपमानाचा बदला 100 जिहादींना मारून घ्या; गंभीरचे ट्विट, सेहवाघची साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानावर दगडफेक झाली होती. भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांनी जवानांच्या समर्थनार्थ ट्विट केले.  

श्रीनगरमधील निवडणुकीनंतर सीआरपीएफच्या जवानावर दगडफेक झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. व्हिडिओतही काही युवक या जवानाला धक्काबुक्की करत असल्याचे, लाथ मारत असल्याचे आणि मारहाण केल्याचे दिसत होते. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. 

सेहवाग आणि गंभीर या दोन्ही क्रिकेटपटूंनी या घटनेबद्दलचा संताप सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ‘माझ्या लष्कराच्या जवानाला एक थापड मारल्याच्या बदल्यात किमान १०० जिहादींना ठार मारा. ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे त्यांनी देश सोडून जावे. काश्मीर आमचा आहे,’ असे गंभीरने टि्वटर हँडलवर लिहिले आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, ‘आमच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ काय होतो हे भारत-विरोधी लोक विसरले आहेत. केशरी रंग आमच्या संतापाच्या आगीचे, पांडरा रंग जिहादींसाठीच्या कफनचे तर हिरवा रंग दहशतवाद्यांविरुद्धच्या तिरस्काराचे प्रतीक आहे.’ 

सेहवागही या छायाचित्रामुळे आणि व्हिडिओमुळे विचलित झाला आहे. त्याने म्हटले आहे की, ‘हे अस्वीकारार्ह आहे. आपल्या सीआरपीएफ जवानाशी असे करता येऊ शकत नाही. हा थांबायला हवे. दोन्ही क्रिकेटपटूंनी आक्रमक भूमिका घेण्याची ही पहिली वेळ आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...