नवी दिल्ली- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी गांधी कुटूंबातील सदस्य सुटीवर आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या उत्तराखंडामधील निसर्गाच्या सान्निध्यात विश्रांती घेत आहेत, तर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या युरोपच्या दौर्यावर आहेत. विशेष म्हणजे प्रियांका गांधी या देखील आपल्या मुलांसोबत युरोपमध्ये सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेल्या आहेत.
गांधी कुटूंबातील सदस्य लवकरच आपल्या सुट्या संपवून परतणार असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
(फोटो: उत्तराखंडमध्ये सुट्यांचा आनंद घेताना सोनिया गांधी.)