आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी जयंती : 'गंधी' शब्दापासून तयार झाले गांधी, अर्थ 'सुगंध पसरवणारा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधी, एक असे नाव ज्याला भारताच नव्हे तर जगभरातही कोणत्याही परिचयाची गरज नाही. हे नाव आज एक विचार बनला आहे. सर्व महाशक्तींनी उशीरा का होईना पण हा विचार स्वीकारला आहे. पण गांधी शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्न अनेकदा समोर येत असतो.
गांधी या शब्दाचा अर्थ सुगंध विकणारा असा होतो. गांधी या शब्दात गंध या शब्दाचा वापर संस्कृतमधील गंधऐवजी सुगंध विकणे अशा अर्थाने आहे. बाजारात विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असतात. पण त्याने सुगंध पसरायलाच हवा असे नाही. याठिकाणी 'गांधी' शब्दाचा अर्थ व्यापकपणे सुवास किंवा सुगंधाशीच संबंधित आहे.
संस्कृतमध्ये ‘गंध’ शब्दापासून गंधे, गंधी किंवा गांधिक, गंधक, गंधर्व, गांधील, गंधाली, गन्धेली, गंधवार्ता असे अनेक शब्द तयार होतात. ‘घृत गंधी भोजन’ याचा अर्थ उत्तम सुवासिक भोजन असा होता. गंधर्व हा नृत्य - गाण्याद्वारे सगळीकडे सुगंध सपरवणा-या एका जमातीला म्हटले होते. अशा प्रकारे ‘गंध’ पासून गंधी आणि ‘गांधी’ हा शब्द तयार झाला.


पुढे वाचा, सुगंध पसरवणे म्हणजे गांधीगिरी कशी...