आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार गांधी, लाख मोदीही देश स्वच्छ करू शकत नाही, मोदींनी दिला स्वच्छतेचा धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी म्हणाले कोणतेही काम छोटे नसते. स्वच्छतेसाठी प्रत्येक भारतीयाने पुढाकार घेतला पाहिजे. - Divya Marathi
मोदी म्हणाले कोणतेही काम छोटे नसते. स्वच्छतेसाठी प्रत्येक भारतीयाने पुढाकार घेतला पाहिजे.
नवी दिल्ली -‘एक हजार महात्मा गांधी, एक लाख नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री एकत्र अाले तरी ते देशाला स्वच्छ करू शकत नाहीत. १२५ कोटी नागरिक या कामात उतरले तरच देश स्वच्छ होऊ शकेल,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सोमवारी केले. ते स्वच्छ भारत अभियानाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.   

मोदी यांनी स्वच्छतेसाठी वैचारिक बदल घडवून आणणे आणि यावर राजकारण करू नये, असे आवाहनही केले. ते म्हणाले, स्वच्छता हा प्रत्येक नागरिकाचा स्वभाव आहे. मात्र, यासाठी पुढाकार कोण घेईल? तीन वर्षांपूर्वी हे काम सुरू केले होते तेव्हा अनेकांची त्याची खिल्ली उडवली. टीकेचा भडिमारही केला. गांधीजींनी दाखवलेला मार्ग चुकीचा असू शकत नाही याची मला खात्री होती. खिल्ली आणि टीका सुरू असतानाही हे काम जारी ठेवले. आता देश या दिशेने अग्रेसर होत आहे. स्वच्छतेची खिल्ली, टीका किंवा राजकारण केले जाऊ नये. उलट ही जबाबदारी समजून प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि संपूर्ण समाजाने या कामात उतरले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...