आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : श्री गणेशाच्या आकाराचा 500 कोटींचा जगातील सर्वात अनोखा हिरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हंगेरियन डेलिगेशनला हिरा दाखवताना कनुभाई आसोदरिया)
सुरत (गुजरात)- शहरातील महिधपुरा परिसरातील हि-याच्या बाजारपेठेत जगातील सर्वात अनोखा हिरा उपलब्ध आहे. 500 कोटी रुपये किमतीचा 182 कॅरेटचा हा हिरा श्री गणेशाच्या आकारातील आहे. हा हिरा महिधरपुरा येथील हि-याचे उद्योगपती कनु आसोदरिया यांच्याकडे आहे. कनुभाई यांच्याकडे सुमारे 12 वर्षांपासून हा हिरा आहे. कनुभाई यांनी बेल्जियममध्ये हा हिरा खरेदी केला होता.

आतापर्यंत जगभरातील अनेक हिरा उद्योगपतींनी या हि-यासाठी बोली लावली आहे. पण कनुभाई यांना हा हिरा विकण्याची इच्छा नाही. गणेशाच्या आकाराचा जगातील दुर्मिळ हिरा आहे. त्यामुळे त्याचे मूल्य ठरवता येणार नाही. विशेष म्हणजे हि-याचा हा आकार नैसर्गिक असल्याचे ते सांगतात.

त्याचमुळे कनुभाईंकडे असलेला हा हिरा पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात. सोमवारी हंगेरीचे एक शिष्टमंडळ हिरा पाहण्यासाठी पाहण्यासाठी आले होते.
पुढील स्लाइड्सवर करा हि-याच्या या श्रीगणेशाचे दर्शन... पाहा PHOTO
सर्व फोटो-दिव्य भास्कर...