आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत पतीसमोरच नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चार नराधमांनी नवदाम्पत्याला नोकरी आणि भाड्याने घर देण्याचे आमिष दाखवून तीन दिवस डांबून ठेवले तसेच पतीसमोरच 20 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. औरंगाबादमध्ये फिल्मीस्टाईल अपहरण करून अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म करण्यात आले आहे.

आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित दाम्पत्याला गोकुलपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु आपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गदारोळ तसेच तोडफोड केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यात 15 जण जखमी झाले. आपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यात राहणारे नवदाम्पत्य तीन दिवसांपूर्वी लोनी येथे पोहचले होते. पीडित महिलेचा पती मेरठ येथे कामाला होता. त्यांचे एक महिन्यापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे मेरठला परतले होते. परंतु घरमालकासोबत बाचाबाची झाल्यामुळे दोन्ही पंजाबमध्ये जाणार्‍या रेल्वेत बसले. नद्यांना आलेल्या पुरामुळे गाडी सहारनपूर येथे थांबली. त्यानंतर दोघे दिल्ली जाणार्‍या बसमध्ये बसले. आणि लोणी येथे उतरले. तेथे त्यांना जौहरीपूर येथील रहिवासी दिगंबर याच्यासोबत ओळख झाली. दिगंबर याने त्यांना नोकरी आणि भाड्याने घर देण्याचे आमिष दाखवले. परंतु जौहरीपूर येथील भाड्याच्या घरात पोहचता दिगंबरसह त्याचा मित्र रवी आणि अन्य दोघांनी त्यांना डांबून ठेवले आणि पतीसमोरच चौघांनी आळीपाळीने 20 वर्षीय नवविवाहितेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर दोघांना जिवे मारण्‍याची धमकीही दिली.