आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gang Rape Incidents In Delhi NCR 14 Year Old Minor Raped

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपींमध्ये MBA चा विद्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - दिल्‍ली-एनसीआर परिसरात पुन्हा एकदा सामुहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गाझियाबादमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर तिघांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर गुड़गावमध्ये एका 35 वर्षीय महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
गाझियाबादच्या मोदी नगर परिसरात नववीच्या वर्गात शिकणा-या एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यापैकी दोघे विद्यार्थी असून त्यापैकी एक एमबीएचे शिक्षण घेत आहेत. ललित कुमार, राजन कुमार आणि गुड्डू अशी तिघांची नावे आहेत. या तिघांचेही वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. राजन गाझियाबादच्या एका खासगी महाविद्यालयातून एमबीए करत आहे.

अपहरण करून केले दुष्कृत्य
ही घटना गुरुवारी दुपारी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगी शिवण क्लासहून परतत असताना या तिघांनी कारमध्ये तिचे अपहरण केले व एका घरात नेऊन तिच्याबरोबर दुष्कृत्य केले. या घरात राजन भाड्याने राहतो, असे पीडितेच्या भावाने सांगितले. सायंकाळी चार वाजता या मुलीला एका निर्जन स्थळी सोडून फरार झाले. घटनास्थळी छापा मारला तेव्हा पोलिसांना बिअरच्या बाटल्या आणि कार मिळाली.
तिन्ही आरोपींना अटक
या तीन आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात विविध कलमांनुसार बाल लैंगिक शोषणाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढे वाचा - गुडगावमध्ये महिलेचे अपहरण करून बलात्कार