आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangrape In Up Accused Cut Of Fingers Of Minor Girl, News In Marathi

युपीत पुन्हा गॅंगरेप: अल्पवयीन मुलीच्या हातापायाचे बोटे कापून केली निर्घृण हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- मेरठ जिल्ह्यातील एका तरुणीवर गॅंगरेप करून तिला धर्मांतरात भाग पाडल्याची घटना ताजी असताना अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी मुलीवर सामूहीक बलात्कार करून त्याच्या हाता-पायाची बोटे कलम करून तिची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बस्ती जिल्ह्यातील वाल्टरगंज ठाण्याच्या हद्दीतील संसारपूर गावात एका अल्पवयीन मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळून आला. गावकर्‍यांनी या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीवर सामूहीक बलात्कार करून नंतर तिच्या हात-पायाची बोटे कापून तिची निर्घृण हत्या केल्याचे तिच्या कुटूंबियांसह गावकर्‍यांचे म्हणणे आहे. पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने प्रथमदर्शनी हे प्रकरण सामूहीक बलात्काराचे दिसत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलीच्या गुप्तांगालाही नराधमांनी दुखापत केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलगी संसारपूर येथील रहिवासी आहे.
पो‍लिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी (5 ऑगस्ट) सायंकाळी मोबाइल रिचार्ज करण्यासाठी घराबाहेर निघाली होती. मात्र, खूप उशीर झाला तरी ती घरी आली नसल्याचे पाहून कुटूंबीय तिचा शोध घेत होते. रात्रभर शोध घेतल्यानंतरही तिचा पत्ता लागला नाही. मात्र सकाळी गावाच्या एका रस्त्याच्या कडेला विवस्त्रावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.