आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangrape, Minor Rape, Rape In Restaurants, Delhi, Damini Gangrape, New Delhi

बंदुकीचा धाक दाखवून रेस्टॉरन्टमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मानवतेला काळीमा फसणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीला पाच नराधमांनी बंदूकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. ब्रह्मपुरी रोडवरील बालाजी रेस्टॉरन्टमध्ये ही घटना घडली.

दिल्लीत गॅंगरेपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच पैकी तीन आरोपींना अटक केली आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. रेस्टॉरन्टच्या मालकालाही पोलिसांनी अटक केली आहे.

जाफराबादमध्ये गुरुवारी दिवसाढवळ्या पीड‍ित तरुणीचे अपहरण करण्‍यात आले होते. त्यानंतर त‍िला रेस्टॉरन्टमध्ये नेवून तिच्या पाच जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. वैद्यकीय तपासणीत तरुणीवर बलात्कार झाल्याचे स्पष्‍ट झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी तिच्या बह‍िणीसोबत बाजारात आली होती. तेथूनच तिचे दोघांनी अपहरण केले. त्यानंतर तिला ब्रह्मपुरी रोडवरील बालाजी रेस्टॉरन्टमध्ये नेवून तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणीला रेस्टॉरन्ट बाहेरसोडून नराधम पसार झाले होते. तिचे वडील तेथे आल्यानंतर तिने त्यांना आपबीती सांगितली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा संपूर्ण घटना...