आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangrape News In Marathi, Delhi, Crime, Police, Divya Marathi

दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये एका 40 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. शहरातील हौजखास भागात रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या ओळखीच्या एका तरुणाने कामाच्या बहाण्याने महिलेस घरी बोलावले होते. त्या वेळी त्याने मित्रांसोबत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने याबाबतची तक्रार पोलिसांत दिली आहे.

दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. अन्य एका घटनेत शनिवारी रात्री कारमधून आलेल्या तीन तरुणांनी दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यानंतर आरोपींनी मुलींना मारहाण केली. निजामुद्दीन भागात ही घटना घडली.


संबंधित मुली ऑटोरिक्षामधून जात असताना कारमधून आलेल्या तीन तरुणांनी जबरदस्तीने त्यांना कारमध्ये ओढले. ऑटोचालकाने विरोध केल्यानंतर आरोपींना त्यालाही मारहाण केली. चालकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.