आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या हॉटेलात अमेरिकी महिलेवर सामूहिक बलात्कार, गाइडसह 5 जणांविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका अमेरिकी महिलेवर दिल्लीतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या वर्षीच्या मार्च महिन्यात घडलेल्या घटनेची तक्रार पीडितेने ई-मेलद्वारे दिल्ली पोलिसांकडे केली. त्यानंतर या महिलेने गाइड म्हणून सोबत घेतलेल्या व्यक्तीसह इतर पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, ती मार्चमध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती. दिल्लीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबली होती. तिच्या गाइडने आपल्या चार साथीदारांसह हॉटेलमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर ती महिला अमेरिकेला परत गेली होती. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिने ई-मेलद्वारे फिर्याद दिली. याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब यांना सांगितले आहे.

अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरणा यांना पीडितेची भेट घेण्याचे निर्देशही स्वराज यांनी दिले आहेत. मार्चमध्ये अमेरिकी पर्यटकावर सामूहिक बलात्कार झाल्याच्या बातम्या मी वाचल्या आहेत, असे ट्विट स्वराज यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...