आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव: एमबीबीएसच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, चार संशयित ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव- मेडिकलच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 15 फेब्रृवारीला ही घटना घडली. पीडित तरुणीने मंगळवारी (21 फेब्रुवारी) पालकांसोबत  पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली तेव्हा हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडीत मुलीने दिलेल्या माहितीवरून आरोपी मुत्यानटी गावचे रहिवाशी असून, याप्रकरणी पोलीसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. अन्य दोघांचा तपास पोलीस करत आहेत.

कर्नाटकातील धारवड येथील मुळ रहिवाशी असलेली तरूणी बेळगाव येथे एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. 15 फेब्रुवारीला ती मित्रासोबत काकती डोंगरावर फिरायला गेली होती. तिथे आधीच उपस्थीत असलेल्या पाच जणांनी तरूणीशी छेडछाड करत ओढून नेले आणि तिच्यावर सामुहीक अत्याचार केले. तरूणीच्या मित्राने विरोध केला तर त्यालाही मारहान करण्यात आली. पीडित तरुणीने मंगळवारी पोलीसात तक्रार दिल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.  

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...