आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली पुन्हा हादरली, विदेशी महिलेवर नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका लाजीरवाण्या घटनेने हादरली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन येथून एका विदेशी महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी 8 जणांविरू्दध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 5 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश आले आहे.
डेन्मार्कची रहिवासी असलेली 51 वर्षीय महिला भारत दर्शनासाठी येथे आली होती. याबाबत अशी माहिती मिळाली आहे, की ही महिला आग्राहून दिल्लीत आली होती. ती पहाडगंज येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. मंगळवारी ती नॅशनल म्यूझियम पाहण्यासाठी गेली होती. यावेळी परत येताना ती रस्ता चुकली. त्यामुळे कॅनॉट प्लेसपासून रेल्वे स्टेशनदरम्यान एका अनोळखी स्थळी पोहोचली.
तिने काही व्यक्तींकडे विचारपूस केली. त्यांनतर त्या व्यक्तींनी तिला चाकू दाखवून अज्ञात ठिकाणी नेले. तिच्याजवळ असलेले पैसे लुटले व सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडित विदेशी महिलेने कशीबशी सुटका करून घेतली. तिने याबाबतची माहिती एका मित्राला व डेन्मार्क दूतावासाला दिली. यानंतर डेन्मार्क दूतावासाने दिल्ली पोलिसांना याबाबतची माहिती दिली. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तत्काळ पावले उचलत पीडित महिलेचे बयान नोंदवून घेतले. पोलिसांनी 8 अज्ञात व्यक्तींविरू्दध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
पुढे वाचा, विदेशी महिलेची खोटी कहानी व विदेशी महिलांवर बलात्काराच्या घटनेवर टाकलेला प्रकाशझोत...