आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टारच्या भावाने तुरुंगात केली अधिकाऱ्याला मारहाण, म्हणाला 'तूने मेरे भाई आनंदपाल को मारा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - याठिकाणी हाय सेक्युरिटी जेलमध्ये एसओजीचे सीआय सूर्यवीरसिंह यांच्यावर हल्ला झाला आहे. हा हल्ला गँगस्टार आनंदपालचा भाऊ रुपेंद्रसिंह उर्फ विक्कीने केला होता, असे समोर येत आहे. हल्ला करताना रुपेंद्र ओरडत होता, तूच माझा भाऊ आनंदपालला मारले आहे. बुधवारी रुपेंद्रपाल सिंहला जयपूरला आणले. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले. 

असे आहे संपूर्ण प्रकरण.. 
- विक्कीला बराकमधघून अधीक्षकांच्या खोलीत आणताच त्याने इन्सपेक्टर राठोड यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोळ्याला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या. 
- त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोडवले आणि विक्कीला नेऊन कडक सुरक्षेमध्ये ठेवण्यात आले आहे. 
- विक्की देवेंद्रला सूर्यवीर सिंह राठोडनेच कमांडो सोहन सिंह, डेप्युटी एसपी विद्याप्रकाश हरियाणा पोलिस यांच्या मदतीने पकडले होते. 
- त्यानंतर आनंदपालच्या ठिकाण्याबाबत माहिती मिळाली आणि तो एन्काऊंटरमध्ये ठार झाला. 

देवेंद्र मोंटीला अटक 
- आनंदपाल फरार असताना वसुलीच्या प्रकऱणी त्याचा चुलत भाऊ देवेंद्र गटाचा सदस्य मोंटीला अजमेरमध्ये अटक केली होती. 
- बिकानेर जेलमध्ये गुन्हेगारांच्या हाणामारीनंतर सरकारने हाय सेक्युरिटी जेल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. 
- तुरुंगातून कोणालाही गुन्हेगारी कामे करता येऊ नये यासाठी हा निर्णय घेतला होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या गँगस्टारचे PHOTOS... 
फोटो- मुकेश परिहर
बातम्या आणखी आहेत...