आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gareeb Admi Party Candidate Fight Against Arvind Kejriwal

आम आदमी Vs गरीब आदमी; नाराज कार्यकर्त्‍यांचे केजरीवाल यांना आव्‍हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभा निवडणूकीचे वातावरण चांगलचे तापले आहे. 'आप'ला शह देण्‍यासाठी 'भाजप'ने 'किरण बेदी' यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करून मास्टरस्ट्रोक मारला आहे. या खेळीमुळे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची गोची झाली आहे. भाजपने जेरीस आणल्‍यानंतर 'आप' समोर आणखी एक संकट उभे राहिले ते 'गरीब आदमी पार्टी'चे. केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केल्‍याचा आरोप करत आपमधील नाराज कार्यकर्त्‍यांनी वेगळी चूल मांडली आहे. आपमधील नाराज कार्यकर्त्‍यांनी 'आप'ला धडा शिकवण्‍यासाठी 'गरीब आदमी पार्टी' (गॅप)ची स्‍थापना केली आहे.
या पक्षातील लोक कधीकाळी अण्‍णा हजारेंच्‍या अंदोलनात सहभागी झाले होते. मात्र 'आप' पक्षावर नाराज झाल्‍यामुळे त्‍यांनी नविन पक्षाची स्‍थापना केली आहे. या पक्षाचे फेसबुक पेज आणि वेबसाईट तयार करण्‍यात आली आहे. 'आप'सारखाच या पक्षाचा शॉर्ट फॉर्म तयार करण्‍यात आला आहे 'गॅप'.
केजरीवाल यांना आव्‍हान-
दिल्ली विधानसभा निवडणूकीत नवी दिल्ली मतदार संघात रिंगनात उतरलेले केजरीवाल यांच्‍या विरोधात कॉंग्रेसचे किरण वालिया, भाजपचे नूपुर शर्मा हे दिल्लीतील नामवंत चेहरे निवडणूक लढवत आहे. यांच्‍याबरोबच केजरीवाल यांना 'गॅप'च्‍या 'अजीत' यांनी आव्‍हान दिल्‍यामुळे दिल्ली निवडणूकीकेडे देशाचे लक्ष लागले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'गरीब आदमी पार्टीचा प्रचाराची पद्धत...