आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत लग्न घरी सिलिंडरचा ब्लास्ट, तीन च‍िमुरड्यांसह सहा जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील जसोला भागात एका घरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने सहा जणांचा मृत्यु झाल्याची घटना घटली आहे. मृतांमध्ये तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली.
स्फोट झाला त्या घरात विवाह समारंभ असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट झाल्यानंतर घरात आग भडकली. त्यात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

(फाईल फोटो)