आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता थेट बँक खात्यात जमा होणार गॅस सबसिडी; देशातील ५४ जिल्ह्यांत प्रयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील ११ राज्यांच्या ५४ जिल्ह्यांत शनिवारपासून एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा करण्याची योजना पुन्हा सुरू होणार आहे. या ग्राहकांना गॅस सिलिंडर बाजारभावाने विकत घ्यावे लागेल. त्यावरील अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. संपूर्ण देशभरात १ जानेवारीपासून ही योजना लागू होणार आहे. त्याद्वारे सरकारची दहा हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते.

यूपीए सरकारने १ जून २०१३ ला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजना (डीबीटी) सुरू केली होती. गॅसवरील सबसिडीसाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते. टप्प्याटप्प्याने २९१ जिल्ह्यांत ही योजना लागूही झाली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशांमुळे वर्षाच्या सुरुवातीला योजना गुंडाळावी लागली. मात्र, आता अनुदानासाठी आधार कार्डची अट मागे घेण्यात आली आहे.आधीच या योजनेत समाविष्ट व अनुदान मिळालेल्या ग्राहकांना ही कसरत करण्याची गरज नाही. शिवाय ग्राहकांना wwwया वेबसाइटवर त्यांना आपले नाव पाहून त्याची खातरजमा करता येईल.
कमी वजनाचे छोटे सिलिंडर मिळणार
लवकरच लोकांना पाच किलोपेक्षा कमी वजनाचे गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. हे सिलिंडर एक ते दोन किलोचेही असेल. परंतु हे सिलिंडर त्यांना बाजारभावानुसार खरेदी करावे लागेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.