आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसा करणाऱ्या गोरक्षकांवर कडक कारवाई होईल: मोदी, राज्य सरकारांची कारवाईची जबाबदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी गोरक्षणावर भूमिका मांडली. - Divya Marathi
रविवारी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी गोरक्षणावर भूमिका मांडली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले की, गोरक्षणाच्या नावावर हिंसा करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. पीएम म्हणाले की, गोरक्षणाचा मुद्दा देशभरात भावनिक आहे. बैठकीनंतर, माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी मोदींच्या वक्तव्याची माहिती दिली. कुमार यांनी सांगितल्यानुसार, पीएम म्हणाले की, गोरक्षणाच्या नावावर हिंसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. राष्ट्रपती निवडणुकीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, जर सर्वसंमतीने निवडणूक झाली असती तर चांगले झाले असते.
 
आणखी काय म्हणाले पीएम...
- मोदींनी राज्यांना सांगितले की, गोरक्षणाच्या नावावर कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची असते. मोदी असेही म्हणाले की, गोरक्षणाच्या प्रकरणाला राजकीय अथवा सामाजिक रंग दिला नाही पाहिजे, यामुळे देशाचे कोणतेच हित साधणार नाही.
- मोदी म्हणाले की, गायीला माता मानले जाते, परंतु याचा अर्थ असा नाही की लोकांना कायदा आपल्या हातात घ्यावा. पंतप्रधानांनी नॉर्थ-ईस्ट राज्यांतील पूरस्थितीवर चिंता व्यक्त केली.
- बैठकीनंतर मोदी असेही म्हणाले की, गाय आपली माता आहे, परंतु कुणीही कायद्याला आपल्या हातात घेता कामा नये. जर कुणी असे करत असेल, राज्य सरकारांनी त्यांच्यावर कारवाई करावी.
- तथापि, कथित गोरक्षकांच्या प्रकरणावर विरोधी पक्षांनी भाजपवर वेळोवेळी निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...