आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gautam Gambhir To Bear Full Expenses Of The Children Of 25 CRPF Personnel Killed In Sukma Attack

क्रिकेटपटू गौतम गंभीर सुकमामध्ये 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- छत्तीसगडमधील सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 74 डेल्टा बटालियनचे 25 जवान शहीद झाले होते. या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर सरसावला आहे. जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करणार असल्याचे गौतम गंभीर याने जाहीर केले आहे.

सामन्यावर लक्ष केंद्रीत करू शकलो नाही..
- न्यूज एजन्सीनुसार, गंभीरने सांगितले की, सुकमामध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर खूप अस्वस्थ झाला होतो. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यावरही लक्ष केंद्रीत करता आले नाही. रायझिंग पुणे सुपरजाईंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान गंभीर आणि संघातील क्रिकेटपटूंनी मनगटावर काळी फित बांधून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
- 'बुधवारी सकाळी वृत्तपत्र हातात घेतल्यानंतर सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या मुलींचे फोटो पाहिले. एक मुलगी आपल्या शहीद वडिलांना सॅल्यूट करत होती तर दुसरी आपल्या दु:खी नातेवाईकांना सावरत होती. शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च गौतम गंभीर फाउंडेशन करणार आहे. माझ्या टीमने काम सुरु केले आहे. लवकरत यावर झालेल्या डेव्हलपमेंटबाबत माहिती देईल, असे गंभीरने सांगितले आहे.

दरम्यान बुरकापालमध्ये सोमवारी सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्याचा कट नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमाने 20 दिवसांपूर्वीच रचला होता. यासाठी छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशातून 300 पेक्षा अधिक नक्षलवादी एकत्र आले होते.

पीपल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला आर्मीने (पीएलजीए) हा हल्ला घडवून आणला. यासाठी त्यांनी घटनेपूर्वीच रात्री शस्त्रास्त्रे लपवण्यात आली होती. त्यानंतर 2-2 च्या गटाने नक्षलवादी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी “व्ही’च्या आकारात घेराव घालत जवानांवर तिन्ही बाजूंनी गोळीबार सुरू केला. जवानांनी सुमारे 2 तासांपर्यंत त्यांचा सामना केला. जवळपास प्रत्येकच झाडावर गोळीबाराचे निशाण होते आणि 200 मीटरपर्यंत जागोजागी रक्ताचा सडा पसरला होता, यावरूनच या हल्ल्याची भीषणता लक्षात येते.

घटनास्थळाजवळील लोकांनी गाव सोडले : नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केलेल्या घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरात सीआरपीएफच्या कोब्रा टीमने मंगळवारी शोधमोहीम राबवली. त्यामुळे या भागातील नागरिक गाव सोडून इतरत्र गेले. आंध्र प्रदेशमध्ये ग्रेन हाउंडफोर्स आणि ओडिशा सीमेवर ओडिशा पोलिससुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सूत्रांच्या मते, हल्लेखोरांना शोधण्यासाठी तीन राज्यांचे संयुक्त अभियान सुरू आहे.
 
बलिदान व्यर्थ जाणार नाही: गृहमंत्री
नक्षलवाद्यांशी लढा देण्याच्या रणनीतीवर नव्याने चर्चा करण्यासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांची 8 मे रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. छत्तीसगडच्या सुकमामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले असताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. गरज भासल्यास आम्ही नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी रणनीतीसुद्धा बदलू.

पुढील स्लाइडवर वाचा... शहीद जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची एक कोटींची मदत, राजनाथ सिंहांनी मानले आभार
 
 
बातम्या आणखी आहेत...