आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gay News In Marathi, Supreme Court Refuses To Review Verdict

समलिंगी संबंध बेकायदेशीरच, सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या केंद्र सरकार, नाझ फाऊंडेशन आणि गे राईट्स कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
सेक्शन 377 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरविले आहे. यासंदर्भात डिसेंबर 2013 मध्ये न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.
संमतीने प्रस्थापित झालेल्या समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरविल्याने देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि स्वातंत्र्य असल्याच्या मुलभूत हक्कावर गदा येत असल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. त्यामुळे यावर फेरविचार व्हावा, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.
यावर गे राईट्स कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.