आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geetika Sharma Suicide Case, Gopal Kanda, Delhi Crime

गीतिका आत्महत्याप्रकरणी हरियाणातील माजी मंत्री गोपाल कांडावर आरोपपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हवाई सुंदरी गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात हरियाणातील माजी मंत्री गोपाल गोयल कांडा आणि त्यांची सहकारी अरुण चढ्ढा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दिल्लीच्या एका न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासह इतर आरोपांत खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. सुनावणी विशेष न्यायालयात होणार आहे.

काय आहेत आरोप- कॉम्प्युटर हॅकिंग, आत्महत्येसाठी प्रोत्साहन देणे, लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट , बनावट कामे असे अनेक आरोप कांडा यांच्यावर आहेत.

काय आहे प्रकरण- गीतिकाने 4 ऑगस्ट 2012 रोजी घरात फाशी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने दोन पानी पत्र लिहून ठेवले होते. त्यात कांडा आणि अरुणा यांना दोषी ठरवण्यात आले होते. पोस्टमॉर्टेममध्ये गीतिकाचे शारीरिक शोषण झाल्याची पुष्टी झाली होती.