आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Election 2014: Modi Can Be Targeted By Human Bomb

नरेंद्र मोदींवर आत्मघाती हल्ल्याची शक्यता, गुप्तचर विभागाकडून सतर्कतेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थेने व्यक्त केली आहे. गुप्तचर संस्थेच्या अधिका-याने सांगितले, की मोदींवर हल्ल्याची शक्यता लक्ष्यात घेऊन सर्व राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी राजस्थानमध्ये इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी जिया उर रहेमान ऊर्फ वकाससह दिल्ली एटीएस पथक आणि राजस्थान पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे. वकासवर 10 लाखांचे बक्षीस होते. यासीन भटकळचा जवळचा मानला जात असलेला वकास इंडियन मुजाहिदीनचा कडवा अतिरेकी मानला जातो. त्यांच्या चौकशीत लोकसभा निवडणुकी दरम्यान घातपाताची योजना असल्याचे समोर आले आहे. देशातील सर्वच पक्षांतील काही मातब्बर नेत्यांना निशाणा करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. यात मोदी वरच्या क्रमांकावर आहेत. काही महिन्यांपूर्वी पाटणा येथील भाजपच्या सभेत मोदी मंचावर येण्याच्या काही क्षण आधी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार मोदी यांच्या शिवाय काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या नेत्यांना सर्वाधिक धोका आहे. राज्यांना दिलेल्या सतर्कतेच्या आदेशात या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मोदी वाराणसी आणि वडोदरा येथे उमेदवारी दाखल करताना त्यांच्यावर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात पोलिस आणि उत्तरप्रदेश व महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.