आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Election 2014: RSS Comes Against Induction Of Sabir Ali In BJP

भाजपात नवे युद्ध: पक्ष प्रवेशासोबतच साबीर अलींना घ्यावे लागले नकवींशी वैर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - भारतीय जनता पक्षात इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यावरुन पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी साबीर अली यांना पक्ष प्रवेश दिल्याने पक्षातील जूना मुस्लिम चेहरा असलेले मुख्तार अब्बास नकवी नाराज झाले आहेत. मोदींची स्तुती केल्यामुळे जनता दल (यू) मधून साबीर अली यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, काही तासांतच पक्षाचे प्रवक्ते नकवी यांनी ट्विटरवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, अतिरेकी भटकळच्या मित्राने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. लवकरच पक्षात दाऊदही येईल.
साबीर अली यांनी आज दैनिकभास्कर.कॉमशी बातचीत करताना सांगितले, की त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत. अशा आरोपांमुळे दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपींची बिहार भाजप प्रभारींकडून चौकशी व्हावी. तपास पूर्ण होई पर्यंत माझे सदस्यत्व स्थगित करावे.'
साबीर यांनी आरोप सिद्ध झाले तर, राजकारणातून सन्यास घेण्याचीही घोषणा केली आहे. मात्र, ते सिद्ध झाले नाही तर आरोप करणा-यांनी नैतिक जबाबदारी देखील स्विकारली पाहिजे, असे म्हणत त्यांनी नकवी यांचे नाव न घेता त्यांना आव्हान दिले आहे.
साबीर यांच्यासाठी भाजपची वाट मात्र, बिकट दिसत आहे. भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांच्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पूर्ण समर्थन आहे. संघाने सार्वजनिकरित्या साबीर अली यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. संघाने भाजप नेत्यांना साबीर अली यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. आरएसएसचे मीडिया प्रभारी राम माधव यांनी ट्विट केले आहे, की साबीर अली यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे अनेकजण नाराज आहेत. भाजप नेतृत्वाला याबद्दल कळविण्यात आले आहे की कार्यकर्ते आणि लोकभावना या निर्णयाच्या विरोधात आहे.'

कोण आहेत साबीर अली
साबीर अली
वय - 43 वर्षे
रक्सौल, बिहार.
- 2005 मध्ये लोक जनशक्ती पक्षातून (एलजीपी) राजकारणाला सुरवात.
- एलजीपीने रा्ज्यसभेचे खासदर केले.
- 2011 मध्ये साबीर अली यांनी जनता दल (यू)मध्ये प्रवेश केला.
- त्यानंतर जेडीयूने त्यांना राज्यसभेवर निवडून गेले. पक्षाचा मुस्लिम चेहरा आणि प्रवक्ते ही त्यांची ओळख होती.
- साबीर अली यांची ओळख एका उद्योजकाची आहे. त्यांच्याबद्दल असे बोलले जाते की, ते नितीशकुमारांना फंडींग करीत होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, साबीर अलींनी मुख्तार अब्बास नकवींना पाठवलेले पत्र