आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Elections 2014: Jaswant Singh To Filen Nomination From Badmer

जसवंतसिंहाचा भाजपला रामराम, मोठ्या प्लॅनचा परिणाम आहे वरिष्ठांची नाराजी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षातील तिकीट वाटपाचा घोळ काही थांबताना दिसत नाही. आता गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारमधील माजी मंत्र्यांनी बंडखोरी केली आहे. कानजी पटेल यांना वलसाड येथून उमेदवारी हवी होती. मात्र, त्यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या कानजी पटेल यांनी बंडखोरीचे संकेत देत तिकीट वाटपाचा सौदा केला गेल्याचा आरोप केला. ते म्हणाले, पक्षाने बेडूक उडया मारणा-यांना तिकीट दिले आहे. आता पक्षाचा प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे नाव न घेता त्यांनी सत्तेचे सौदागर संबोधले आहे. कानजी पटेल हे गुजरातमधील वरिष्ठ आदिवासी नेते आहेत. 48 वर्षांपासून ते भाजपसोबत आहेत.
राजस्थानमधील बाडमेर येथून येथून उमेदवारी नाकारलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांनी आज (सोमवार) त्याच मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. याशिवाय हरिन पाठक देखील आज 'मोठा निर्णय' जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, पक्ष मागे हटण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. त्याचे कारण वरिष्ठांना बाजूला करुन भाजपमध्ये एका नव्या शक्तीचा केंद्राचा उदय करणे आहे.
भाजपमधील राष्ट्रीय नेत्यांच्या श्रेणीत जसवंतसिंह यांच्याशिवाय, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या मुद्यावर बंडखोरीची घोषणा केलेली आहे. मात्र, यापैकी एकाचेही पक्षाने ऐकलेले नाही. पक्षातील सुत्रांचे म्हणणे आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) स्पष्ट संकेत आहेत की, बंडखोरांपुढे झुकायची गरज नाही. त्यामुळे नव्या नेतृत्वासमोरील (नरेंद्र मोदी) अंतर्गत गटबाजीचा प्रश्न आपोआप निकाली निघेल.

पुढील स्लाइडमध्ये, राष्ट्रीय सोबतच राज्यांच्या पातळीवरही नेत्यांकडे दुर्लक्ष