नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भलेही स्वतःला पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगत असले तरी, ताज्या सर्वेक्षणानुसार मुख्य लढत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातच होणार आहे. गेल्या महिन्यातील सर्वेक्षणानुसार राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे, तर मोदींची घटली आहे.
सीएनएन-आयबीएन-लोकनीती-सीएसडीएसने सहा राज्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार 31 टक्के मतदारांनी पंतप्रधानपदासाठी मोदींना योग्य उमेदवार ठरविले आहे तर, 13 टक्के जनतेला राहुल गांधी या पदासाठी योग्य वाटत आहेत. जानेवारी मध्ये हीच आकडेवारी मोदींसाठी 36 टक्के तर, राहुल यांच्या बाजूने 12 टक्के होती. सोनिया गांधींनाही (तीन टक्क्यावरुन चार टक्के)गेल्या महिन्याच्या तुलनेत एक टक्क्याने वाढ मिळाली आहे.
केजरीवाल यांची लोकप्रियता मात्र जैसे थे (चार टक्के) आहे. सर्वेक्षणानुसार
चार-चार टक्के लोकांनी मुलायमसिंह आणि मयावतींनाही पंतप्रधानपदासाठी पसंती दिली आहे. गुरुवारी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत
नितीशकुमार यांनी स्वतःला पंतप्रधानपदासाठी मोदींपेक्षा योग्य उमेदवार असल्याचे म्हटले होते. या सर्वेक्षणानुसार केवळ दोन टक्के जनतेने त्यांना पसंती दिली आहे. तर, सध्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (तीन टक्के) मात्र एक टक्क्याने त्यांच्या पुढे आहेत.
पुढील स्लाइडमध्ये,
राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आघाडी