आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचा प्रवक्ता होण्यास इच्छुक पत्रकार अटकेत, मुंबईच्या झुबेर खानला दिल्ली पोलिसांनी पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - इराक व सिरियासह अनेक देशांत सध्या दहशतवादी कारवाया करून धुमाकूळ घालणाऱ्या इस्लामिक स्टेट (इसिस) संघटनेचा प्रवक्ता होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुंबईतील पत्रकाराला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. झुबेर अहमद खान असे त्याचे नाव आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला फासावर लटकवल्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या या कथित पत्रकाराने फेसबुक पेजवर आपण इसिसचा प्रवक्ता होऊ इच्छित असल्याचे म्हटले होते. ३० जुलै रोजी झुबेरने ही पोस्ट केलेली आहे. एका सोशल मीडिया युजरने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. झुबेरने या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘मी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीत दाखल होईन. इराकच्या वकिलातीस भेट देऊन व्हिसाची मागणी करीन. तेथे इसिसमध्ये सामील होण्याची थेट घोषणा करीन.’

फेसबुक पोस्टमध्ये आहे काय? :
झुबेर खान याने पोस्टमध्ये मुंबई हल्ल्यातील दोषी याकूब मेमन याला शहीद संबोधले आहे. इसिसने आपले प्रवक्तेपद दिले तर आपण भारताचे नागरिकत्व सोडण्यासही तयार आहोत, असेही त्याने नमूद केले होते.

यापूर्वीही त्याने सोशल मीडियावर इसिसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी याच्या नावाने जाहीर पोस्ट टाकून आपल्याला इसिससाठी पत्रकारिता करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. त्याची ही पोस्ट नंतर व्हायरल झाली होती.
झुबेर आहे कोण?
झुबेर खान पत्रकार असल्याचे सांगतो. माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, लोकप्रशासन विषयात त्याने पदवी घेतलेली असून तो मुंबईचाच रहिवासी आहे. दरम्यान, झुबेरचे हे सोशल अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...